” वाचनाने माणसाच्या जीवनाला आकार प्राप्त होतो….”– विजय देसाई

“आजचे युग हे यांत्रिक युग म्हणून ओळखले जात असले माणसाला घडवण्यासाठी त्याच्या आयुष्यात वाचन हे महत्वाचे असते.आणि म्हणून वाचनानेच माणसाच्या जीवनाला खऱ्या आर्थाने आकार प्राप्त होतो.”असे भावपूर्ण उदगार सामाजिक कार्यकर्ते श्री विजय देसाई यांनी खारेपाटण नगर वाचनालय आयोजित वाचन प्रेरणा दीन कार्यक्रमात बोलताना काढले.
खारेपाटण सार्वजनिक नगर वाचनालयाच्या वतीने नगर वाचनालयाच्या अध्यक्षा सौ मंगला राणेबाई यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच खारेपाटण शिवाजी पेठ येथील नगर वाचनालयाच्या कार्यालयात डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून वाचन प्रेरणा दीन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला खारेपाटण नगर वाचनालयाचे विश्वस्त व पत्रकार सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष पाटणकर, विश्वस्त व खारेपाटण हायस्कूलचे शिक्षक श्री राजेश वारंगे सर,ग्रंथपाल श्री महेश सकपाळ,सहाय्यक ग्रंथपाल सौ रिया जाधव,वाचनालय कर्मचारी श्री बाबू लाड,वाचक व ग्रामस्थ श्री संदेश पाटणकर,श्री उदय जामसंडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
खारेपाटण नगर वाचनालयाचे विश्वस्त व सामाजिक कार्यकर्ते श्री विजय देसाई यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. तर नगर वाचनालयाचे विश्वस्त श्री संतोष पाटणकर व श्री राजेश वारंगे यांच्या शुभहस्ते भरताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी खारेपाटण नगर वाचनालयाचे विश्वस्त श्री विजय देसाई,राजेश वारंगे व श्री संतोष पाटणकर यांनी वाचन प्रेरणा दीना निमित्त वाचकांना शुभेच्छा दिल्या.व डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांना स्मृतींना उजाळा देऊन त्यांना अभिवादन केले.
उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत कार्यक्रमाचे सूत्रसंचलन खारेपाटण नगर वाचनालयाचे ग्रंथपाल श्री महेश सकपाळ यांनी केले.तर सर्वाचे आभार सहाय्यक ग्रंथपाल व लिपिक सौ. रिया जाधव यांनी मानले.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण