खारेपाटण – शेर्पे केंद्रस्तरीय तिसरी संयुक्त शिक्षण परिषद चिंचवली येथे संपन्न

माहे ऑक्टोबर महातील खारेपाटण – शेर्पे केंद्र स्तरीय शिक्षण परिषद नुकतीच कणकवली तालुक्यातील चिंचवली या गावातील जि.प.मधलीवाडी शाळेत उत्साहात संपन्न झाली.
यावेळी विविध शैक्षणिक विषयांवर अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन मान्यवरांकडून करण्यात आले. दीपप्रज्वलन करुन शिक्षण परिषदेची सुरुवात करण्यात आली.
खारेपाटण व शेर्पे केंद्रातील शिक्षक श्रीम.मोहिनी साळुंखे आणि श्री.प्रवीण कासार यांनी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणोत्तर कार्य या विषयावर मुद्देसूद मार्गदर्शन केले. इंग्रजी पायाभूत रचना या विषयावर उपशिक्षिका प्रिया झगडे यांनी उदाहरणे देत संवाद साधला. दिव्यांग अध्ययन स्तर निश्चिती या विषयाचे मार्गदर्शन नाजमीन मुल्ला यांनी केले. तसेच शेर्पे खारेपाटण कासार्डेचे केंद्रप्रमुख संजय पवार यांनी तपशीलवार प्रशासकीय मार्गदर्शन केले. CMP प्रणाली विषयी त्यांनी विशेष मार्गदर्शन केले.
या शिक्षण परिषदेला जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१चे उच्चश्रेणी केंद्रमुख्याध्यापक श्री प्रदिप श्रावणकर, केंद्रमुख्याध्यापक दशरथ शिंगारे,श्रीपाद बागडी, सखाराम बागडी,खारेपाटण हायस्कुलच्या माजी प्राचार्या रानडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
चिंचवली मधलीवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. सविता दाबेराव यांनी उपस्थित सर्व मान्यवर शिक्षकांचे गुलाबपुष्प देऊन यथोचित स्वागत केले.शाळेचे शिक्षक श्री अमोल भंडारी यांनी शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन केले. चिंचवली मधली शाळेने उत्तम नियोजन केल्याबद्दल केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!