युवा महोत्सव म्हणजे नव-युवा शक्तीचा जागर

- – डॉ.राजश्री साळुंखे.
कणकवली/मयुर ठाकूर.
शिक्षण प्रसारक मंडळाचे कणकवली कॉलेज, कणकवली येथे कनिष्ठ विभागाच्या वतीने मंगळवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२३ रोजी युवा महोत्सव आयोजित केला होता.महोत्सवाचे उद्घाटन डॉ.सौ.राजश्री साळुंखे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन झाले.या वेळी प्र.प्राचार्य युवराज महालिंगे,पर्यवेक्षक ए.पी चव्हाण, गटविकास अधिकारी विजय चव्हाण ,सिने-नाट्य कलाक्षेत्रात कार्यरत असणारे अभय खडपकर, सुहास वरूणकर ,निलेश पवार ,शरद सावंत, मिलिंद गुरव, शेखर गवस ,सत्येंद्र जाधव ,संजय मालंडकर,रघुनाथ कदम ,श्याम नाडकर्णी आणि माजी पर्यवेक्षक एम.डी.कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. भिसे यांनी “विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी, कनिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी आणि विविध कला क्षेत्रामध्ये नावाजलेले माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले ” असे नमूद केले. यानंतर विचारमंचावर उपस्थित सर्व मान्यवर कलाकार माजी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ,सन्मानचिन्ह व ‘कनक’ वार्षिक अंक देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा हा महोत्सव म्हणजे नवशक्तीचा जागरच आहे.यातून भविष्यात उत्तम उत्तम कलाकार घडतील””
याप्रसंगी विजय चव्हाण,अभय खडपकर ,निलेश पवार यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना युवा महोत्सवासाठी मार्गदर्शनपर शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महालिंगे यांनी कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर संबोधन केले.या युवा महोत्सवासाठी माजी पर्यवेक्षक एम.डी.कांबळे यांनी रुपये पाच हजार रु.देणगी देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले.उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक व्ही.आर .सावंत यांनी आणि आभार प्रदर्शन प्राध्यापक एन.एस. नाईक यांनी केले. या कार्यक्रमासाठी वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक,प्राध्यापिका ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.