मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा

कुडाळ : बाळासाहेबांची शिवसेना कुडाळ तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने ठिकठिकाणी साजरा करण्यात आला. भविष्यातही सामाजिक बांधिलकी जोपासून अशाप्रकारचे उपक्रम हाती घेतले जातील असे महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर यांनी सांगितले.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांची शिवसेना स्थापन केल्यानंतर यामध्ये जिल्ह्यात अनेकांचा प्रवेश होत आहे. पक्षाच्या स्थापनेनंतर आपल्या मुख्यमंत्र्यांचा पहिलाच वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात साजरा होत आहे. कुडाळ तालुक्याने हा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचे नियोजन केले. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालय तसेच माड्याचीवाडी येथील जिव्हाळा सेवाश्रम (वृध्दाश्रम) या ठिकाणी फळे, अन्नधान्याचे तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना वर्षा कुडाळकर म्हणाल्या, आपण समाजात वावरत असताना सामाजिक बांधिलकी महत्त्वाची आहे .हीच महत्त्वाची शिकवण आमच्या पक्षाच्या माध्यमातून मिळत असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जोपासून करत आहोत. माड्याचीवाडी येथील वृद्धाची मनोभावे सेवा करणाऱ्या जिव्हाळा सेवाश्रमात आम्ही सातत्याने येत असतो. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आम्ही सर्वजण येऊन या वृद्धासमवेत वाढदिवसाच्या औचित्य साधून आनंद साजरा केला. भविष्यातही पक्षाच्या माध्यमातून आम्ही सामाजिक सेवा करण्यासाठी निश्चितच कार्यरत राहू. आरोग्य क्षेत्रातही यापुढे विविध उपक्रम हाती घेतले जातील त्यांनी असे सांगितले.
यावेळी कुडाळ तालुका प्रमुख योगेश तुळसकर, उपजिल्हा संघटक नीलम शिंदे ,अनघा रांगणेकर, रामकृष्ण गडकरी, अग्रवाल, जयदीप तुळसकर, पुंडलिक जोशी, चैतन्य कुडाळकर, सिद्धेश मोंडकर, महेंद्र सातार्डेकर, अनिरुद्ध गावडे, अरविंद करलकर उपस्थित होते. यावेळी जिव्हाळा सेवाश्रमचे संस्थाचालक सुरेश बिर्जे तसेच ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ

error: Content is protected !!