इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२३ सायकल मॅरेथॉन १२ रोजी

कुडाळ : इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२३ सायकल मॅरेथॉनला रत्नागिरी,पुणे,मुंबई, कोल्हापूर, गोवा,सिंधुदुर्ग मधून ४०० सायकलपटूंनी सहभाग घेतला असून सिंधुदुर्ग जि प चे मुख्याधिकारी श्री प्रजित नायर,उपपोलिस अधिक्षक सिंधुदुर्ग श्री बगाडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री काळे आणि बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे श्री उमेश गाळवणकर यांचे हस्ते उद्घाटन होणार आहे.25,50,100 किमी मध्ये हि सायकल मॅरेथॉन होणार आहे.
सिंधुदुर्ग सायकल असोसिएशन च्या माध्यमातून व कुडाळ सायकल क्लब यांच्या नियोजनातून इन्स्पायर सिंधुदुर्ग 2023 दिनांक 12 फेब्रुवारी 2023 होत असलेल्या सायकल मॅरेथॉन मध्ये आजपर्यंत जवळजवळ 400 सायकलपटूंनी रजिस्ट्रेशन केले असून सुमारे 500 सायकलिस्ट या इव्हेंटमध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.कुडाळ एमआयडीसी येथील बॅरिस्टर नाथ पै विद्यालयाच्या पटांगणावरून या सायकल मॅरेथॉनला सकाळी सहा वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. सर्वप्रथम शंभर किलोमीटर अंतर पार करणारे सायकल स्वार यांना मार्गस्थ केले जाणार. व त्यानंतर पन्नास किलोमीटरवर 25 किलोमीटर मधील सहभागी सायकलिस्ट ना मार्गस्थ केले जाणार आहे. या सायकल मॅरेथॉन चा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रजीत नायर तसेच उप पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग श्री बगाडे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री काळे आणि बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे श्री उमेश गाळवणकर यांच्या उपस्थितीत होणार असून त्यांचा सहभाग देखील असणार आहे. 25 किलोमीटर वेंगुर्ला मठ पर्यंत व परत, पन्नास किलोमीटर वेंगुर्ला बंदर व परत, शंभर किलोमीटर वेंगुर्ला , पाट, परुळे मार्गे मालवण व कट्टा धामापूर मार्गे परत. या मार्गावर ठराविक अंतरावर हायड्रेशन पॉईंट ठेवण्यात आलेले आहेत.
तसेच सुसज्ज तीन ॲम्बुलन्स व फिरती पथके देखील असणार आहेत. या सायकल मॅरेथॉनच्या समारोप प्रसंगी विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्यांच्या उपस्थितीतच सर्व फिनिशर्स सन्मान होणार आहे. तरी इच्छुक सायकलिस्ट ना अजूनही यामध्ये सहभागाची संधी आहे. तरी पर्यावरण पूरक मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष गजानन कांदळगावकर, सचिव अमोल शिंदे,कुडाळ सायकल क्लब चे अध्यक्ष रूपेश तेली, इव्हेंट चेअरमन शिवप्रसाद राणे यांचेकडून करण्यात येत आहे.

प्रतिनिधी / कोकण नाऊ / कुडाळ

error: Content is protected !!