शिवडाव चिंचाळवाडी टेम्ब येथे गौरी विसर्जन उत्साहात.

कणकवली/मयुर ठाकूर.

गौरी पूजन हें भाद्रपद महिन्यातील महत्वाचे व्रत आहॆ.गणपती गजानन विराजमान झाल्यावर प्रत्येकाच्या घरी परंपरेनुसार गौरीचे पूजन केले जाते.अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरींचे पूजन करतात.गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला.तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठागौरी हे व्रत करतात.गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते,म्हणून गौरीला ज्येष्ठागौरी असेही संबोधले जाते.गौरीला नेवेद्य दाखवला जातो तिची पूजा-अर्चा केली जाते आणि सुमारे गौरी विराजमान केल्यापासून तीन दिवसांनी तिचे विसर्जन देखील केले जाते.
शिवडाव चिंचाळवाडी टेम्ब येथे आज गौरी विसर्जन करण्यात आले. सर्व महिला एकत्र येत गौरीला गाऱ्हाण करून एकमेकांना प्रसाद देण्यात आला आणि गौरी विसर्जित करण्यात आल्या.

error: Content is protected !!