बोर्डवे मध्ये ठाकरे गटाला शिंदे यांच्या शिवसेनेचा धक्का

अनेक कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेमध्ये प्रवेश
कणकवली तालुक्यामध्ये ठाकरे गटाला शिंदे यांच्या शिवसेनेने जोरदार धक्का दिला असून, बोर्डवे गावामधील शाखाप्रमुख विवेक एकावडे, माजी शाखाप्रमुख सुनील पेडणेकर, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत प्रशांत सोहनी, सोमा बागवे, नरहरी शिंदे, अनंत केरकर, रोहित कराळे, आदींनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. याप्रसंगी सिंधु रत्न योजनेचे समिती सदस्य किरण सामंत, जिल्हाप्रमुख संजय आंग्रे विधानसभा प्रमुख संदेश पटेल, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, युवासेना प्रमुख निलेश तेली, भास्कर राणे, सचिन वालावलकर, मालवण तालुकाप्रमुख मंगेश गुरव, महेश राणे आदी उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर, कोकण नाऊ, कणकवली