इन्सुलीत खामदेव नाका येथे अपघात

छोट्या बाळाला किरकोळ दुखापत.
बांदा इन्सुली खामदेव नाका येथे गुरुवारी दुपारी स्पीडब्रेकर असलेल्या ठिकाणी कारला मागुन येणाऱ्या कारने ठोकर दिली. त्यात कारच्या मागील भागाचा चेंदामेंदा झाला. कारमधे मागे बसलेली अडीच वर्षाची मुलगी, आणि तीची आई बालंबाल बचावली. मुलीला किरकोळ मार लागला. कार चालक आणि ग्रामस्थांनी दोघांना कारमधून बाहेर काढले. इन्सुली सरपंच तात्या वेंगुर्लेकर, ठाकरे सेनेचे उल्हास सावंत यानी मदतकार्यात भाग घेतला. दोन्ही कार कुडाळच्या दिशेने जात होत्या
ब्युरो न्यूज । बांदा