ओटवणेत “नवं कापणी” ची परंपरा ढोल ताशाच्या , मान मानकरी ब्राह्मणांच्या मंत्र घोषात उत्साहात साजरी

सावंतवाडी-ओटवणे गावच्या संस्थानकालिन रूढी परंपरेतील एक असलेली आणि दरवर्षी गणेश चतुर्थी मध्ये पार पडणारी “नवं कापणी” ची परंपरा ढोल ताशाच्या , मान मानकरी ब्राह्मणांच्या मंत्र घोषात उत्साहात साजरी झाली मान मानकरी, कुळघर येथे जमा झाल्यानंतर कुळघर येथून वाजत गाजत नवं कापणीच्या ठिकाणी ग्रामस्थ मानकरी यांनी देव देवतेला साकडे घालत मंत्र घोषात, ढोल ताशाच्या गजरात नव्याची कापणी करण्यात आली . आणि त्यानंतरच त्याची विधिवत पूजा करून घरातली देव देवतांसह दरवाज्यावर ही नव्याची तोरणे बाधणयात आली ( फुटोऱ्यावर आलेल्या भाताच्या लोंब्यानी तयार केलेली तोरणे) गावच्या प्रत्येक रूढी परंपरेला एक वेगळी आख्याहिका आहे.ही तोरणे घरात दरवाजावर सजल्याने घरात सौख्य येते आणि गावातील भातपीक भरभरून येत अशी श्रद्धा आहे आणि यानंतरच तयार भाताच्या कापणीला प्रारंभ होतो .साडेचारशे हून अधिक काळ लोटला तरी ओटवणेतील प्रत्येक धार्मिक रूढी परंपरा त्याच उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजऱ्या होतात असतात नवं कापणी ही परंपरा तर गणेश चतुर्थीत साजरी होत असल्याने आणि जरी ग्रामस्थ चाकर मानी यांच्यासाठी नवीन नसली तरी गावी आलेल्या चाकरमान्यां साठी , ग्रामस्थांसाठी ही आगळी वेगळी अशी पर्वणी असते. याही वर्षी ही परंपरा उत्साहात पार पाडली.

error: Content is protected !!