शिवडाव चिंचाळवाडी येथे दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन.

कणकवली/मयुर ठाकूर.
कोकणात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. चकरमाणी गावी येतात आणि सर्वत्र भक्तीभाव पसरलेला असतो.गणपती हा सण वर्षातून एकदा येतो आणि सर्वत्र हर्षाचे वातावरण असते.नातेवाईकांच्या यां निमित्ताने भेटीगाठी होतात आणि कोकणात एक वेगळंच वातावरण तयार होत. आरत्या,भजन पूजन करत भाविक भक्त सेवा करतात.चैतन्याच वातावरण सर्वत्र निर्माण होत.आज शिवडाव चिंचाळवाडी येथे दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले.वाडीतील सर्वजन एकत्र येत गणपती सान्यावर गणपतीची आरती,गाऱ्हाने करण्यात आले आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…. यां जयघोशात गुण्या गोविंदाणे बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.