पूर्वा गावडेची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड
राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत मिळवली दोन मेडल
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग कन्या पूर्वा संदीप गावडे हिने खेलो इंडिया ज्युनियर जलतरण स्पर्धा आणि महाराष्ट्र मिनी ऑलम्पिक स्पर्धेत यश मिळविल्या नंतर राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेतही 17 वर्षाखालील वयोगटातून दोन मेडल पटकावत यश मिळविले आहे. तीची आता राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
पुणे -बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल मध्ये नुकत्याच राज्यस्तरीय शालेय जलतरण क्रीडा स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये पूर्वा गावडे हिने 17 वर्ष वयोगटाखालील मुलीच्या गटात 200 मीटर फ्री स्टाईल मध्ये दुसरा क्रमांक मिळवत रौप्य पदक पटकावले.तर 400 मीटर फ्री स्टाईल मध्ये तिसरा क्रमांक मिळवत कांस्य पदक पटकावले आहे. राज्यस्तरीय शालेय जलतरण क्रीडा स्पर्धे यश मिळविल्यानंतर तिची राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे याबाबद्दल पूर्वाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
सिंधुदुर्गनगरी -ओरोस येथील पूर्वा गावडे ही सध्या पुणे बालेवाडी येथे प्रशिक्षक बालाजी यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणचे राष्ट्रीय प्रशिक्षण घेत असून तिथेच दहावीमध्ये शिक्षण घेत आहे पूर्वा हिने अलीकडेच ओरिसा येथे झालेल्या राष्ट्रीय वॉटरपोलो स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते तर गुजरात मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या खेलो इंडिया ज्युनियर जलतरण क्रीडा स्पर्धेतही रौप्य पदक पटकावले होते. तसेच महाराष्ट्र ऑलम्पिक स्पर्धेत दोन सुवर्ण व दोन कांस्य पदके पटकावली होती त्यानंतर आता राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेतही सातत्य राखत यश मिळविले आहे.
प्रतिनिधी / कोकण नाऊ / सिंधुदुर्ग