मसुरे देऊळवडा येथील हायमास्ट टॉवर कार्यान्वित

मसुरे देऊळवाडा शाळे नजीक असलेला हायमास्ट टॉवर गेली कित्तेक वर्षा पासून बंद होता.येथील ग्रामस्थांनी सर्व संबंधितांकडे, प्रशासनाकडे वेळी पाठपुरावा करूनही हा हाय मास्ट टॉवर सुरू केला गेला नव्हता. अखेर
पप्पू परब व आयावन फर्नांडिस यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून अखेर चालू झाला अशी माहिती शिवसेना युवा पदाधिकारी राहुल सावंत यांनी दिली.देऊळवडा ग्रामस्थानी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे व ग्रामपंचायत चे आभार मानले.

error: Content is protected !!