पोईप मध्ये भाजप आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला भगदाड

संतोष हिवाळेकर । पोईप : पोईप येथील भाजप व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते यांचा रविवारी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश झाला. गेली कित्येक वर्षे शिवसेना उध्दव ठाकरे यांच्या सेनेत निष्ठावंत काम केलेले व शाखाप्रमुख पद भुषविलेले नारायण राणे व भाजप मधील श्रीधर पालव, सुशील जाधव,बाबाजी नाईक, संदिप पोईपकर, गणेश माधव, चंद्रकांत नाईक, लवु पालव, सुनील पोईपकर,अवि जाधव, साईप्रसाद नाईक, गणेश पोईपकर, स्वप्निल पोईप कर ,गोविंद पालव, समीर पालव, गुरू पालव, व भाजप शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते यांनी शिवसेना शिंदे गटाचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे व सुकळवाड पोईप मतदार संघाचे विभागप्रमुख अल्पेश निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.
यावेळी शिवसेना शाखाप्रमुख नारायण विश्राम राणे, उपशाखा प्रमुख श्रीधर पालव, राजु धुरी, चंद्रकांत नाईक,बुथप्रमुख बाबाजी नाईक ,व सुशील जाधव,शिवदुत गणेश माधव, स्वप्निल पोईपकर, समीर पालव, अविनाश जाधव, गणेश पालव, सुनील पोईपकर, गोविंद पालव, चेतन माधव, पोईप सल्लागार लवु पालव,व माजी ग्रामपंचायत सदस्या सौ शुभदा वर्दम,उपस्थित होते.

संतोष हिवाळेकर, कोकण नाऊ, पोईप.

error: Content is protected !!