सावंतवाडीत कॉलेजसमोरून ‘कॉलेज कक्ष’ बोर्ड चोरीला !

उपक्रमाचे कौतुक न करता बोर्ड चोरण्यात कसला आलाय आनंद?

युवा सेना उप जिल्हाप्रमुख सागर नाणोसकर यांचा सवाल

या प्रकारची चौकशी करणार

प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : युवा सेनेच्या वतीने जिल्ह्यात सहा ठिकाणी कॉलेज कक्षची स्थापन करण्यात आली होती. त्याचे बोर्ड हे कॉलेज आवारात न लावता नगर पंचायतची अधिकृत परवानगी घेऊन लावण्यात आले होते. पण असे असून सुद्धा सावंतवाडीत पंचम खेमराज महाविद्यलयाच्या बाहेर लावलेला बोर्ड अज्ञाताने चोरून नेल्याचा प्रकार निदर्शनाला आल्याचे युवासेना उपजिल्हा प्रमुख सागर नाणोसकर यांनी यांनी म्हटले आहे.. हा प्रकार निंदनीय आणि खेदास्पद असल्याचे त्यांनी म्हटले असून या प्रकारची चौकशी केली जाईल असे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
दि. 11 सप्टेंबर रोजी कॉलेज मधील युवकांच्या प्रश्नांना कुठे तरी न्याय मिळावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत 6 ठिकाणी कॉलेज कक्षची स्थापना करण्यात आली होती, याचे बोर्ड कोणत्याही कॉलेजच्या मालकिच्या परीसरात न लावता अधिकृत परवानगी घेऊन नगरपंचायत हद्दीत लावण्यात आले होते. पण सुसंस्कृत असलेल्या सावंतवाडीच्या श्री पंचम खेमराज महाविद्यालय येथील कॉलेज कक्ष स्थापनेचा बोर्ड चोरण्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. महाविद्यालयातील मुलांचे विद्यापीठाचे किंवा अन्य प्रश्न सोडविण्यासाठी स्थापन केलेला हा उपक्रम कोणाच्या जिव्हारी लागला असा प्रश्न युवकांच्या समोर पडला आहे.
तसेच स्वतः मुलांच्या प्रश्नांवर दुर्लक्षित करावे आणि युवासेनेच्या या उपक्रमाचे कौतूक न करता केलेल्या कार्याचे बोर्ड चोरण्यात विरोधकांना आनंद वाटत असल्याचे दिसत आहे. वरील प्रकार हा निंदनीय आणि खेदास्पद आहे या प्रकाराची चौकशी नक्कीच केली जाईल असे युवासेना उपजिल्हा प्रमुख सागर नाणोसकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग.

error: Content is protected !!