बांधकाम कामगार प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी कार्यरत राहू – बाबल नांदोसकर

सिंधुदूर्ग जिल्हा बांधकाम कल्याणकारी संघाचा जिल्हा दौरा

प्रतिनिधी । कुडाळ : बांधकाम कामगार संघटीत होणे काळाची गरज आहे. शासनाच्या कामगारांसाठी असणाऱ्या विविध योजना या तळागाळात पोचल्या पाहिजेत. त्यांचे प्रश्न शासन दरबारी सुटले पाहिजेत यासाठी आम्ही कार्यरत राहू असे प्रतिपादन सिंधुदूर्ग जिल्हा बांधकाम कल्याणकारी संघ जिल्हा अध्यक्ष बाबल नादोसकर यांनी घावनळे येथे केले
   सिंधुदूर्ग जिल्हा बांधकाम कल्याणकारी संघाच्या वतीने जिल्ह्यातील तळागाळात असणारा बांधकाम कामगार हा संघटित झाला पाहिजे, त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, त्यांचे विविध प्रश्न समजावून घेऊन ते शासन दरबारी मांडता यावेत, या उद्देशाने सिंधुदूर्ग जिल्हा बांधकाम कल्याणकारी संघाने जिल्हा अध्यक्ष बाबल नांदोसकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हादौऱ्याचे आयोजन केले होते. कुडाळ तालुक्यात घावनळे येथे दौरा झाला. यावेळी सचिव अनिल कदम, सदस्य विनायक मेस्त्री, महेश पालव, सौ सोनाली मुंज, बाबली जाधव, सुनील खोचरे,  नागेश सावत, साई सावंत, निकिता तेली, सौ साक्षी सावंत, सौ गीतांजली तिळवे, सौ राजश्री बागवे, लक्ष्मण घाडीगावकर तसेच बहुसंख्य कामगार उपस्थीत होते.
यावेळी श्री नादोसकर म्हणाले सिंधुदूर्ग जिल्ह्यात गेले काही महिने कायमस्वरूपी अधिकारी नसल्याने आपल्या सर्व बांधकाम कामगारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे आपला हा बांधकाम कामगार अनेक क्षेत्रात कार्यरत आहे मात्र अनेक योजनापासून हा कामगार वंचित आहे आपल्याला न्याय्य मागण्यासाठी शासन दरबारी आवाज उठविण्यासाठी सर्वप्रथम संघटित होणे काळाची गरज आहे. यासाठीच आम्ही जिल्ह्यात तळागाळात बांधकाम कामगार संघटीत करण्यासाठी पावले टाकली आहेत.   कोंकणात मागील महिन्यापासून सणासुदीला सुरुवात झाली आहे. वाढती महागाईमुळे आपला कामगार अनेक संकटाना सामोरे जात आहे. यासाठी आवाज उठविणे हे आपले पुढचे पाऊल असून त्यानुसार आपण वाटचाल करावी. आमचा बांधकाम कामगार कल्याणकारी संघ तुमच्यासोबत आहे. अशाच प्रकारे संघटना  गावी जाऊन कामगाराना मार्गदर्शन करेल असे सांगत बांधकाम कामगार याना शासन योजना कामगार नोंदणी नुतनीकरण मिळणारे लाभ यासंबंधी मार्गदर्शन केले.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!