कंत्राटी कर्मचारी धनंजय फाले मृत्यू प्रकरणी आमरण उपोषण

विविध संघटना आणि ग्रामस्थ महावितरण समोर छेडणार उपोषण
प्रतिनिधी । कुडाळ : महावितरणचे कंत्राटी कर्मचारी धनंजय फाले यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी कुडाळ विकास समिती, सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, महादेवाचे केरवडे ग्रामस्थ, पिंगुळी-शेटकरवाडी-गुढीपुर ग्रामस्थ आणि कुडाळ तालुका धनगर समाज यांच्या मार्फत उद्या ४ सप्टेंबर रोजी महावितरण कार्यालय, एमआयडीसी कुडाळ येथे आमरण उपोषण करण्यात येणार आहे. अपघात होऊन मृत्यू झाला त्या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी आणि मयत व्यक्तीच्या कुटूंबियांना आर्थिक मदत मिळावी यासाठी हे उपोषण करण्यात येणार आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.