तळवडे गावातील बँक ऑफ इंडिया चे ए टी एम अनेक दिवस बंद

गणपती उत्सवात ग्राहकांची होणार मोठ्या प्रमाणात अडचण
चोरट्याने एटीएम फोडल्यापासून बँक ऑफ इंडियाने एटीएम ठेवले बंदच
सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावं हे विकासाचे प्रतीक मानले जाते .मोठया प्रमाणात बाजारपेठ विस्थार होत असुन सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या असे हे गाव आहे . या गावात अनेक वर्ष बँक ऑफ इंडिया शाखा कार्यरत आहे. गावच्या विकासात या बँक ऑफ इंडियाचां मोलाचा हातभार म्हणावा लागेल. या बँकेचे ए टी एम गेली अनेक महिने बंद अवस्थेत आहे. अजून पर्यंत सुरूच केलें नाही. हे ए टी एम सूरू करावे अशी मागणी ग्राहक वर्ग करत आहे. मात्र बँक प्रशासनाकडून अद्याप पर्यंत कोणतेही दखल घेतलेली नाही. त्यामुळे गणपती उत्सवात मोठ्या प्रमाणात ग्राहकांना याचा फटका बसणार आहे .तळवडे बाजारपेठेचा विस्तार मोठ्या प्रमाणे होत आहे. या बाजारपेठेत फक्त सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एकच एटीएम आहे त्यामुळे मुंबई तसेच अन्य शहरातून येणाऱ्या चाकरमानी यांना. यावर्षी याचा मात्र मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँक ऑफ इंडिया प्रशासन याने यांची दखल घेऊन आपले एटीएम सुरू करावे, अशी मागणी तेवढे ग्रामस्थ व ग्राहकाकडून होत आहे.





