कनेडी राड्यातील १० संशयित आरोपींना अटक
दोन्ही बाजूच्या पाच – पाच जणांचा समावेश
उर्वरित संशयितांना लवकरच ताब्यात घेण्याचे संकेत
कणकवली : कणकवली तालुक्यात कनेडी येथे झालेल्या राड्या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील तब्बल १० संशयित आरोपींना पोलिसांनी काल रात्री उशिरा अटक केली. यामध्ये भाजपा व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दोन्ही बाजूचे समसमान संशयित अटकेत घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आज या सर्व 10 संशयित आरोपींना कणकवली कोर्टात हजर करण्यात येणार आहे. कणकवली पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे व कणकवली पोलिसांनी याबाबत तपास काम सुरू केले असून, कलम 307 अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपींमध्ये कुणाल सावंत, मंगेश सावंत, योगेश वाळके, तर कलम 307 नुसार दाखल असलेल्या दुसऱ्या गुन्ह्यात श्रीकांत सावंत, राजेश पवार व निखिल आचरेकर यांना अटकेत घेण्यात आले आहे. तर 353 नुसार पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दाखल गुन्ह्यात अनिल पांगम, संतोष आंग्रे व संदीप गावकर व तुषार गावकर यांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही बाजूच्या संशयित आरोपीनी काल कणकवली पोलिसात हजर झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची समजते. दरम्यान उर्वरित संशयित आरोपींना देखील टप्प्याटप्प्याने अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली. या गुन्ह्यांच्या तपासा कमी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांच्याकडून तपास काम सुरू करण्यात आले आहे.
दिगंबर वालावलकर / कोकण नाऊ / कणकवली