आशिये नदीपत्रातील गाळ काढण्याबाबत कार्यवाही करणार!

आशिये मध्ये एसटीची मिनीबस सेवा चालू केला जाईल

आमदार नितेश राणेंचे सरपंचांसह ग्रामस्थांना आश्वासन

आशिये गावाला जोडणारा बायपास रस्ता होण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून पोस्ट खात्याचे भूसंपादन केले जाईल. ना. राणे यांच्याशी चर्चा करुन केंद्रात पडलेला प्रस्ताव तातडीने मार्गी लावला जाईल. तसेच आशिये खालचीवाडी येथे पूरस्थिती निर्माण होत असल्यामुळे लगतच्या नदीच्या गाळ उपसा पावसानंतर केला जाईल. आवश्यक असलेली एसटी सेवा मिनी बसच्या माध्यमातून सुरु करण्यात येईल, असा विश्वास भाजपा आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.आशिये गावावर राणे कुटुंबाचे विशेष प्रेम असल्याचे त्यांनी म्हटले.
आशिये खालचीवाडी येथील समस्या जाणून घेण्याची आमदार नितेश राणे यांनी भेट दिली,यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी सरपंच महेश गुरव,मालवणी कवी विलास खानोलकर,उपसरपंच संदीप जाधव, माजी सरपंच शंकर गुरव, बुथ अध्यक्ष प्रवीण ठाकूर, पांडुरंग बाणे,अनिल गुरव, पत्रकार संजय बाणे, अमोल गुरव,सुहास गुरव,शशिकांत पुजारे,सिताराम गुरव, ग्रामसेवक राकेश गोवळकर, विशाखा गुरव ,समीर ठाकूर, संतोष जाधव, प्रवीण पावसकर आदींसह भाजपा पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!