स्थानिक कापड व्यापाऱ्यांच्या “कणकवली स्टाईल” “उत्तर महासेलला “छप्पर फाडके” गर्दी

गर्दी आटोक्यात आणण्यासाठी काही काळ सेलचे प्रवेशद्वार बंद
पहिल्या दिवशी सेलला तुफान प्रतिसाद
कणकवलीतील स्थानिक कापड व्यापाऱ्यांच्या “कणकवली स्टाईल” महासेल ला छप्पर फाडके गर्दी झाली असून, आज उद्घाटना दिवशी सायंकाळी अक्षरशा खरेदी करता महिलांसह ग्राहक तुटून पडले. अखेर सायंकाळी 5.45 वा. दरम्यान गर्दी आटोक्यात आणण्याकरिता सेलचे प्रवेशद्वार काही वेळे पुरते बंद करण्यात आले. तुडूंब गर्दीमध्ये हा सेल अक्षरशा हाऊसफुल झाला असून, छप्पर फाडके गर्दीमुळे या सेलच्या पहिल्या दिवशी ग्राहकांची ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर चांदी झाली आहे.
दिगंबर वालावलकर/ कणकवली





