तळेरे येथील समाज मंदिरात संत रोहिदास महाराजांची जयंती उत्साहात साजरी

खारेपाटण : तळेरे येथील समाज मंदिरात संत रोहिदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संत रोहिदास महाराजांचे व्यक्तित्व, जीवनगाथा, सामाजिक कार्य व शिकवण यांची माहिती समाजास व्हावी या उद्देशाने त्यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
दीपप्रज्वलन व संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेसह तथागत भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमास सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सूर्यकांत तळेकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, संजय पाताडे यांनी उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त करीत सामाजिक प्रबोधन केले.
तसेच याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सुनील बांदिवडेकर, संदीप घाडी, माजी ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील वनकर, व्यापारी संघटना अध्यक्ष स्वप्नील कल्याणकर, शरद वायंगणकर, निलेश सोरप, वासुदेव वनकर, संतोष तांबे, नितीन कांबळे, अनंत नारकर, बाळकृष्ण तांबे, सुनील तांबे, दिनकर नांदगावकर इ. बहुसंख्येने उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार राजेश जाधव यांनी व्यक्त केले.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण