एक्साईज च्या छाप्यात नांदगाव मधून तब्बल 1 लाखाची दारू जप्त

शिवसेना ठाकरे गटाकडून दोन दिवसापूर्वी अवैध दारू विक्री बाबत देण्यात आले होते निवेदन

संशयित आरोपीवर गुन्हा दाखल

कणकवली तालुक्यात नांदगाव तिठा या ठिकाणी अनधिकृत दारू विक्री बाबत टीप मिळाल्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने टाकलेल्या छाप्यात तब्बल 1 लाखाची दारू हस्तगत करण्यात आली. दोन दिवसापूर्वीच शिवसेना ठाकरे गटा कडून अनधिकृत दारू विक्री वरील कारवाईबाबत निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क कडून ही धडक कारवाई करण्यात आली. ही कारवाई बुधवारी दुपारी 12.30 वा. च्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कणकवली पथकाने केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या कारवाईत गोवा बनावटीच्या दारूचे तब्बल 20 बॉक्स 1 लाख किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी तेथील महेश मोर्ये (31) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक प्रभात सावंत यांनी दिली.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!