नांदगाव ग्रामपंचायत कर्मचारी लक्ष्मीकांत मोरजकर हृदयविकाराच्या झटक्याने निधन

नांदगाव ग्रामपंचायत कर्मचारी लक्ष्मीकांत सुधाकर मोरजकर(३९, रा नांदगाव मोरयेवाडी) यांचा शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता
च्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक वृत्त असे की, लक्ष्मीकांत मोरोजकर सकाळी घरी असताना त्यांना अचानक उलटी आली.त्यानंतर ते आंघोळीला गेले असताना चक्कर येऊ लागली.त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र नांदगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून ते मृत झाल्याचे सांगितले.
मृत लक्ष्मीकांत मोरजकर यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली,भाऊ,आई वडील,काका असा परिवार आहे.त्यांनी १५ वर्ष ग्रामपंचायत मध्ये लिपिक म्हणून सेवा बजावली होती.त्यामुळे त्यांचा मोठा मित्र परिवार होता.त्यांच्या दुःखद घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत नांदगाव सरपंच रविराज धोंडू मोरजकर यांनी खबर दिली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!