न्यू इग्लिश स्कूल येथे महसूल सप्ताहानिमित्त युवा संवादाचेआयोजन
महसूल विभागाने वर्षभर केलेल्या लोकाभिमुख कामकाजाचा आढावा लोकांसमोर ठेवण्यासाठी एक ऑगस्ट ला राज्यभर महसूल दिन म्हणून साजरा केला जातो.जनतेला अधिक दर्जेदार सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी यावर्षी शासनातर्फे एक ते सात ऑगस्ट महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त आचरा मंडल अधिकारी अजय परब यांच्या मार्गदर्शनाखाली न्यू इग्लिश स्कूल आचरा येथे महसूल सप्ताहानिमित्त युवा संवादाचे आयोजन करण्यात आले.यावेळी महसूल तर्फे आवश्यक विविध दाखल्यांबाबत शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. तसेच ई पिक पाहणी अँप बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक गोपाळ परब, तलाठी संतोष जाधव, कोतवाल गिरीश घाडी, महाग सेवा केंद्राच्या यशश्री गोसावी, तसेच अन्य शिक्षक आदी उपस्थित होते.
आचरा / अर्जुन बापर्डेकर