डॉ. रुपेश पाटकर यांना सावंतवाडी इथे सरस्वती पवार पुरस्कार

सावंतवाडी
सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान कणकवली तर्फे दिला जाणारा दुसरा सरस्वती लक्ष्मण पवार साहित्य पुरस्कार डॉ रुपेश पाटकर यांना सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिर इथे तीन ऑगस्ट रोजी सायंकाळी चार ते साडे पाच या दरम्यान प्रदांन करण्यात येईल. त्यांच्या ” अर्ज मधील दिवस ” या पुस्तकाला हा पुरस्कार लाभला आहे.
यावेळी हल्लीच सिंधू वैभव साहित्य समूहाचा मधुसूदन नानिवडेकर पुरस्कार मिळालेल्या कवयित्री अंजली मुतालिक यांचा सत्कार करण्यात येईल.
या कार्यक्रमाला डॉ संजीव लिंगवत, वेंगुर्ला आणि देवयानी ओरोस्कर, संपादक, कोकणसाद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील तर अन्याय रहित जिंदगी या शरीर विक्री व्यवसायावरील समस्येवर काम करणारे अरुण पांडे अध्यक्ष म्हणून उपस्थित असतील.
गेल्यावर्षी हा पुरस्कार मिळालेल्या दिशा पिंकी शेख या कार्यक्रमात ऑनलाईन सहभाग घेणार आहेत.