यश कंप्युटर अकॅडमी च्या २१ व्या वर्धापनदिना निमित्त १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘परीक्षेपूर्वीची मानसिक तयारी’ या विषयावर मार्गदर्शन शिबिर संपन्न
खारेपाटण : खारेपाटण हायस्कुल येथिल १२ वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन यश कम्युटर अकॅडमी च्या वतीने करण्यात आले होते.
परीक्षेला समोर जाताना अंतर्मनाच्या क्षमता ओळखून त्यांच्या नियम व अटी समजून सकारात्मक भुमिका घेऊन काम केल्यास यश मिळवणे सोपे होईल असे प्रतिपादन ज्येष्ठ एज्यूकेशनल अॅडव्हायजर, माईंड ट्रेनर सदाशिव पांचाळ यांनी खारेपाटण येथे केले.
शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय, प्र. ल. पाटील ज्युनिअर कॉलेज, खारेपाटण येथे बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘परीक्षेपूर्वीची मानसिक तयारी’ या विषयावर मार्गदर्शन करताना सदाशिव पांचाळ बोलत होते.
हा कार्यक्रम यश कंप्युटर अकादमी, खारेपाटण यांच्यावतीने संस्थेला २१ वर्षे पुर्ण होत असल्याच्या निमित्ताने आयोजित केला होता.
यावेळी व्यासपिठावर प्राचार्य श्री. संजय सानप, सिनिअर कॉलेजचे प्राचार्य कांबळी सर, यश कंप्युटर अकादमीचे संचालक मंगेश गुरव उपस्थित होते.
आपल्याला एखादी गोष्ट घडवून आणायची असल्यास, एखादे यश मिळवायचे असल्यास आपल्या अंतर्मनात तसा विचार रूजवणे गरजेचे असते. ती गोष्ट होईपर्यंत, यश मिळेपर्यंत त्या एकाच विचारांचा ध्यास घेणे, वेड लागल्या प्रमाणे काम केले पाहिजे. अंतर्मन म्हणजे एक जादूई शक्ती असून सकारात्मक विचारांचा संस्कारांने अंतर्मनाकडून कोणतेही यश आपल्या पदरात पाडून घेता येते, यांची उदाहरणे सदाशिव पांचाळ यांनी येथे मांडली. बाह्य मन आणि अंतर्मन यांच्यातील फरक स्पष्ट करुन मुलांच्या क्षमतेची जाणिव यावेळी करून देत सुमारे तासभर चाललेले मार्गदर्शन हसत खेळत पार पडले.
यावेळी प्राचार्य संजय सानप यांनीही विद्यार्थ्यांना समायोचित मार्गदर्शन केले. कांबळी सर यांचेही यावेळी भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यश कंप्युटर अकादमीचे संचालक मंगेश गुरव यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत गुरव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शेट्ये सर यांनी केले.
अस्मिता गिडाळे / कोकण नाऊ / खारेपाटण