भोगलीवाडी तिठा ते बौद्ध वाडी रस्ता अति धोकादायक

भोगलीवाडी तिठा ते बौद्ध वाडी येथील रस्ता नैसर्गिकरीत्या खचलेला आहे. या मुळे हा रस्ता अपघातास कारण ठरला आहे. संभदीत विभागाने त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे.
सदर रस्ता हा माळगाव बालोजी वाडी व बिळवस सातेरी मंदिराला जोडलेला आहे. सदर रस्त्याने कायम वाहतूक चालू असते व शाळेतील मुलासाठी सुद्धा येण्याजण्या साठी तोच रस्ता आहे. सदर रस्ता आपत्तीविवारण म्हणून समजण्यात यावा. तसेच बौद्ध वाडी येथील रस्त्याची डागडुजी लवकरात लवकर करण्यात यावी अन्यथा अपघात होऊन मनुष्यहानी होण्याची शक्यता आहे.भोगलेवाडी ग्रामस्थ मंडळाची मागणी आहे की बौद्ध वाडी येथील रस्त्याची डागडुजी आपत्ती निवारण योजनेखाली दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी सूर्यकांत कृष्णाजी रावराणे अध्यक्ष भोगलेवाडी ग्रामस्थ मंडळ आणि बागायत येथील
सामाजिक कार्यकर्ते समीर पेडणेकर यांनी केली आहे…

मसुरे प्रतिनिधी

error: Content is protected !!