चर्मकार समाज संघटना जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत चव्हाण

सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज संघटना अध्यक्षपदी कणकवली येथील चंद्रकांत तथा सी आर चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय चर्मकार समाज मुंबई महाराष्ट्र संघटनेचे राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण यांनी ही माहिती दिली.
भारतीय चर्मकार समाज मुंबई महाराष्ट्र संघटनेची राज्य व विभाग तसेच जिल्हास्तरीय सभा ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकतीच ओरोस येथे संपन्न झाली ओरस येथील रवळनाथ मंदिरात ही बैठक झाली या बैठकीमध्ये उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली आहे …सरचिटणीस संतोष जाधव
महिला जिल्हाध्यक्ष सौ लक्ष्मी बाबर्डे कर जिल्हा उपाध्यक्ष देवरुखकर गुरुजी सहदेव चव्हाण आणि जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून बाबल नांदोस्कर यांची निवड करण्यात आली आहे.
या बैठकीला राज्य सरचिटणीस अरुण होडावडेकर राज्य उपाध्यक्ष प्राजक्त चव्हाण चंद्रकांत चव्हाण सुरेश चौकेकर कार्याध्यक्ष अनिल चव्हाण सहज सचिव प्रतीक्षा चव्हाण संचालक सौ मालन चव्हाण गणेश चव्हाण प्रभाकर जाधव तसेच जिल्हा युवा सचिव अनिस कुमार चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. समाज बांधवांनी जी मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे तिला न्याय देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन असे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण यांनी सांगितले.
कणकवली ब्यूरो न्यूज