युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित ‘सिंधुरत्न टॅलेंट सर्च’ परीक्षेचा तळेरे केंद्रावर शुभारंभ

खारेपाटण : तळेरे येथील वामनराव महाडिक विद्यालय येथे युवा सिंधू प्रतिष्ठान नाटळ-सांगवे आयोजित ‘सिंधूरत्न टॅलेंट सर्च’ ही स्पर्धा परीक्षा संपन्न झाली. तळेरे येथील परीक्षा केंद्रावर इयत्ता दुसरी ते सातवीमध्ये शिकणारे एकूण २३९ विद्यार्थी या परिक्षेसाठी प्रविष्ठ होते. आजच्या या स्पर्धेच्या युगात विद्यार्थी वर्गाच्या स्पर्धात्मक दृष्टिकोनास चालना मिळावी या हेतूने ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येते. त्यामुळे दरवर्षी बहुसंख्य विद्यार्थी या परीक्षेमध्ये स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील राहतात.

या परीक्षेच्या उद्घाटन सोहळ्यास जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं १ च्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश जाधव व कणकवली पंचायत समितीचे सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच या परीक्षेचे केंद्र संचालक श्री. ज्ञानेश्वर परदेशी सर, परीक्षा निरीक्षक श्री. किरण कोरगावकर सर, श्री. विनायक जाधव सर, श्री. सत्यवान केसरकर सर, श्री. जगदीश गोसावी सर, श्री. सुधाकर कुलकर्णी सर, श्री. तांबे सर, सौ. रसिका कदम मॅडम, पत्रकार श्री. गुरुप्रसाद सावंत आदी मान्यवर तसेच बहुसंख्य परीक्षार्थी विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व देवी शारदेच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून या स्पर्धा परिक्षेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी सुहास पाताडे व राजेश जाधव यांनी उपस्थित परीक्षार्थी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करून या स्पर्धा परीक्षेचे आयोजक असलेल्या युवा संदेश प्रतिष्ठान व संयोजक शिक्षक वृंदाचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रुपाली पवार मॅडम यांनी तर उपस्थितांचे आभार श्री. परदेशी सर यांनी व्यक्त केले.

अस्मिता गिडाळे / कोकण नाऊ / खारेपाटण

error: Content is protected !!