कलमठ मधील वायरमन शिवाजी मोहिते यांची बदली रद्द करा

कलमठ ग्रामस्थांनी वेधले आमदार नितेश राणे व कार्यकारी अभियंत्यांचे लक्ष

कणकवली विभागातील कलमठ गावातील वायरमन शिवाजी ईश्वर मोहिते हे वरीष्ठ वायरमन म्हणुन गेली 4 वर्षे कार्यरत आहेत. कलमठ सदरच्या नागरी वस्तीमध्ये अत्यंत प्रमाणिकपणे काम करीत आहेत. कलमठ मधील वाढते शहरीकरणामुळे वारंवार होणा-या अडचणीकरिता श्री.मोहिते हे अनुभवी कर्मचारी असल्याने त्यांची बदली झाल्यास मोठया प्रमाणात समस्या निर्माण होवु शकतात. त्यामुळे त्यांची बदली तात्काळ रद्द करा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने आमदार नितेश राणे व कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्याकडे करण्यात आली आहे.
श्री.मोहिते यांची बदली रद्द करुन भविष्यात संभाव्य समस्याचे निराकरण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी आमदार नितेश राणे यांनी देखील कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्याशी फोनवरून चर्चा करत सूचना दिल्या. याप्रसंगी सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच स्वप्निल चिंदरकर, ग्रामपंचायत सदस्य पप्पू यादव, परेश कांबळी, जितू कांबळी आदि उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!