आयडियल इंग्लिश स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात.

कणकवली/मयुर ठाकूर
ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि जुनि. कॉलेज मध्ये 'गुरु पौर्णिमा' मोठ्या दिमाखात साजरी झाली.महर्षी व्यास मुनींच्या पुजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.यानंतर मान्यवरांच्या हस्ते सर्व शिक्षकांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.प्रशाळेतील् इयत्ता 10 विच्या विध्यार्थ्यांनी व मान्यवारांनी गुरुपौर्णिमेच महत्व सांगितले.गुरु व्यास हे जगतगुरू आहेत आणि त्यांचे ज्ञान सर्वांनी आत्मसात् करूया असे मंत प्रमुख अतिथी श्री येंडे सर यांनी व्यक्त केल .या कार्यक्रम प्रसंगी ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्यद्यक्ष बुलंद पटेल,सल्लागार डी. पी.तानावडे,श्री.येंडे सर. आय डि यालच्या मुख्याध्यापिका अर्चना देसाई आदी मान्यवर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.




