ग्राहक पंचायतीच्या कणकवली शाखेच्या अध्यक्षपदी श्रद्धा कदम

ग्राहक पंचायत महाराष्ट्र,कोकण विभागातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांची कार्यशाळा संपन्न.

कणकवली/मयुर ठाकूर.

ग्राहक पंचायत महाराष्ट्र, कोकण विभागातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्याची कार्यशाळा आज दिनांक 2 जुलै 2023 रोजी कणकवली येथील आप्पासाहेब पटवर्धन सभागृहामध्ये घेणेत आली.
सदर कार्यशाळा तथा सभेला अध्यक्ष म्हणून ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्य सचिव मा. अरुणजी वाघमारे हे उपस्थित होते. तसेच
सिंधूदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष मा. एस एन पाटील , रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे अध्यक्ष उपस्थित होते. प्रथम सर्व उपस्थितांचे यथोचित स्वागत करणेत आले. त्यानंतर उपस्थित सर्वांनी आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. वैभववाडीचे अध्यक्ष तेजस यांनी ओघवत्या शैलीत व अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले. तर सरपंच, ग्रामसेवक यांच्या बैठका बोलावून आपल्या शाखेबद्दल तालुक्यातील 67 गावांना माहिती द्या व फायदा घेणे बाबत आवाहन करून ग्राहक पंचायत चा प्रसार करा, लोकप्रतिनिधी शी संपर्क करा, कार्यकर्ते वाढवा व सर्वात महत्वाचे म्हणजे event न करता movement करा या शब्दात जेष्ठ पत्रकार मा. अशोकजी करंबेळकर यांनी मार्गदर्शन केले.मा दादा कुडतरकर, जिल्हा संघटक यांनी ओघवत्या दमदार शैलीत शुभेच्छा दिल्या, तर ज्यांच्या कालावधीत कणकवली मध्ये ग्राहक पंचयातचे राज्यस्तरीय अधिवेशन घेऊन संस्थेचा पाया कनकवलीमध्ये भक्कम करणारे तालुक्याचे अध्यक्ष मा नामदेव जाधव यांनी मनोगतामध्ये सांगितले की वर्षभर काम केले पण ते ग्राहक पंचायत च्या साचा मध्ये बसवू न शकल्याची खंत व्यक्त केली. तसेच जेष्ठ सल्लागार श्री पालयेकर यांनी शुभेच्छा पर मार्गदर्शन करून आशावादी सूचना केल्या.
त्यानंतर मा. पाटील सर यांनी पुढिलप्रमाणे उपस्थितांना मार्गदर्शन केले – ग्राहक पंचायतचे नवीन कार्यकर्ते तयार होताहेत, व्यासपीठावर येऊन भरभरुन बोलताहेत याचा मला आनंद आहे. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो म्हणूनच ग्राहक पंचायत सारख्या संस्था मधून सेवा करणेसाठी हे एक चांगले व्यासपीठ आहे. ग्राहक हाच केंद्रबिंदू मानून राजकारण विरहित काम इथेच करता येते. यातून मी माणसे शोधण्याचे काम करतोय. प्रामाणिक काम करणाऱ्यांना मी धन्यवाद देतो. प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या पदाला न्याय द्या, कामाचा व्याप वाढवा, शाळा कॉलेज मधून जा, जन जागृती करा, संस्थेचे लेटर हेड तयार करा, सर्व पदाधिकारी यांना ओळखपत्रे पुरवा, आणि आपण सर्व कार्यकर्ते आहोत हे लक्षात ठेवा. ग्रामसेवक, तलाठी, पोलिसपाटील, नगरसेवक यांना हाताशी धरा म्हणजे तुमची लोकांची कामे होतील, ग्रामसभेला उपस्थित राहा, काही अडचण आली तर माझेशी केंव्हाही संपर्क करा. पण कायम कार्यरत राहा.
त्यानंतर अध्यक्षपदावरून मार्गदर्शन करताना, सर्वांच्या मनोगताला उत्तर देताना मा. वाघमारे साहेब म्हणाले –
प्रथम मी एक कार्यकर्ता आहे, कार्यकर्ता नेहमी श्रेष्ठ असतो. वैभववाडी चे परब सर यांची उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून निवड झालेली असून ते कोकणचे भूषण आहेत. महानंदा चव्हाण मन लावून काम करतात. राज्य ग्राहक आयोग रचना परिपूर्ण होणेसाठी प्रयत्न सुरू आहेत. ग्राहक पंचायत चे काम कसे चालते याबाबत फलक लावा, जनजागृती होईल, जागतिक ग्राहक दिन बंदिस्त जागेत न घेता शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उघड्या जागेत घ्या. ग्रामसभेला उपस्थित राहुन ग्राहक प्रबोधणासाठी 5 मिनिटे मागून घ्या, शाळा महाविद्यालयात जाऊन प्रबोधन करा, सजग विद्यार्थी ग्राहक तयार करा, त्यातील 5 टक्के विध्यार्थी जरी तुमच्या हाताला लागले तरी आपला देश जगतवंदीता होईल हे लक्षात ठेवा. गाव तिथे ग्राहक पंचायत असली पाहिजे, ऊर्जा बैठका चालवा, तुमची कार्यपद्धती ठरवा आनि पत्रकारांना तशी प्रेस नोट द्या. पोलीस स्टेशन मध्ये स्वागत कक्ष असावा, त्यासाठी पाठपुरावा करा. म्हणजे सर्वसामान्य माणूस तक्रार करायला धजावेल, शाळा महाविद्यालये यांच्या बाहेर रस्त्यावर गावगुंड मुलींना त्रास देतात त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबर सुसंवाद ठेवून मदत करा, समन्वय ठेवा, हेच ग्राहकाचे हित आहे. राज्य परिवहन च्या डेपो मॅनेजर ला भेटून माहिती घ्या, जनतेला रेशनकार्ड रेशन वेळेवर मिळत नाही त्यासाठी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटा, डोळसपणे कामे करा. आठवडा बाजारात फिरून वस्तूंच्या किंमतीवर लक्ष ठेवा, ” माझं गाव माझं व्हिजन ” या संकल्पनेतून काम करा. विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले दिले जातात त्या ठिकाणी जाऊन त्यांना मदत करा. प्रशासकीय यंत्रणेला लेखी पत्र देऊन त्यांच्याशी मृदू भाषेत संवाद करा, पत्रे देताना आवश्यक प्रोटोकॉल पाळणे गरजेचे आहे लेखणी युद्ध करा. शुद्ध विचाराच्या कार्यकर्त्यांची ग्राहक पंचायत ला गरज आहे, समाजाचे आपण देणे आहोत, मी संपूर्ण देशात फिरतो, माझी ही देशाची चौथी परिक्रमा आहे, तुम्ही काही ना काही कारणाने प्रत्येक ग्रामपंचायतीला भेट द्या. आपण 2 हत्यारे वापरून काम करू शकतो पहिले म्हणजे एखादी वस्तू चुकीच्या पद्ध्तीने विक्री होत असेल तर सामूहिक पद्धतीने त्यावर बहिष्कार घाला, दुसरी लेखणी, तिच्या मदतीने लिहिते व्हा, लेखणीचा दुधारी तलवार म्हणून वापर करा. सिस्टिम च्या माध्यमातून काम करा, सर्वांशी मैत्रीपूर्ण व्यवहार असणे आवश्यक आहे, संवाद, समन्वय, कल्यानंम. अशाप्रकारे शोषणमुक्त समाज निर्माण करायला मदत करा,समाजहीताचे काम करा. कोकण ही पवित्रभूमी आहे, आणि तुम्ही त्या पवित्र भूमीत जन्म घेतलेला आहे. ग्राहक हे ब्रह्मास्त्र आहे. माझी कार्यपद्धती ही संख्यात्मक नाही तर गुणात्मक आहे, लेखनियुद्ध म्हणजे दुर्जनशक्ती चा नाश करून सुजनशक्ती उभी करणे. माणसाला आपले मत मांडता येते, पशूला नाही, म्हणून आपले मतमांडून संबंधित खातेप्रमुखाला post card वर का होईना ना पण लेखी कळवा, व प्रकट व्हा कारण त्याची गरज आहे.
त्यानंतर दिनांक 5 व 6 ऑगस्ट रोजी जळगाव येथे होणाऱ्या राज्य अभ्यास वर्गाला एक मित्रमेळावा म्हणून सर्वांनी मोठया संखेने उपस्थित राहाणेबद्दल जाहीर निमंत्रण दिले.
ग्राहक पंचयातचे सचिव महानंदा चव्हाण यांच्या यथोचित सुत्रसंचलनाने कार्यक्रमाला रंगत आली, शेवटी सर्व मान्यवरांच्या उपस्थित पुढील प्रमाणे कणकवली शाखेची नवीन कार्यकारिणी निवडणेत आली
1) श्रद्धा कदम अध्यक्ष
2)गीतांजली कामत, उपाध्यक्ष
3)पूजा सावंत, सचिव
4)आयेशा सय्यद, कोषाध्यक्ष
5)चंद्रकांत चव्हाण, संघटक
6) विनायक पाताडे, सहसचिव

  सर्व नवीन पदाधिकारी यांचे अभिनंदन  करणेत आले . अशा प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणात कार्यशाळा संपल्याचे श्री महानंदा चव्हाण यांनी जाहीर केले.
error: Content is protected !!