कणकवलीत सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या इमारतीवर झाड कोसळले
नगरपंचायत कर्मचाऱ्यांकडून तात्काळ पडलेले झाड आले हटवण्यात
कणकवली शहरात आज दुपारच्या सुमारास शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला असलेल्या बांधकाम उपविभाग कार्यालयाच्या इमारतीवर झाड कोसळल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळतात मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी देखील तत्काळ दखल घेत नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या पथकाला घटनास्थळी पाठवून झाड हटवण्यात आले. मात्र यात मोठे नुकसान झाले नाही. यावेळी नगरपंचायत कर्मचारी मनोज धुमाळे, मिथुन ठाणेकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर कणकवली