रामेश्वर वाचनालय आचरा येथे सोमवारी कृषीविषयक ग्रंथप्रदर्शन
आचरा–अर्जुन बापर्डेकर
*श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा या संस्थेने सोमवार दि.३ जुलै २०२३ रोजी ठीक १०.३० वाजता कृषिविषयक पुस्तके व कृषिविषयक संदर्भ ग्रंथाचे ग्रंथप्रदर्शन संस्थेच्या वाचन कक्षात आयोजित केले आहे. तसेच संस्थेचे कार्यकारिणी सदस्य श्री. भिकाजी कदम यांच्या परस बागेत वृक्षारोपणाचा कार्यक्रमही आयोजित केला आहे .या कार्यक्रमास आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर,,बँक ऑफ इंडिया शाखा- आचरा . शाखाधिकारी भाग्यश्री कुलसंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
तरी सर्व वाचन प्रेमी आणि कृषीप्रेमींनी ग्रंथप्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या सर्व कार्यकारिणी व सांस्कृतिक समिती सदस्यांनी केले आहे.