शहर विकास आघाडी आयोजित पाककला स्पर्धेत क्षमा कार्यकर ठरल्या विजेत्या

दीपा कलिंगण द्वितीय तर सई बिडये तृतीय
नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आली होती स्पर्धा
नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहर विकास आघाडी च्या वतीने येथील नगरवाचनालय सभागृहात पालकला स्पर्धेचे आयोजन केले होते. यात क्षमा कारेकर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. दीपा कलिंगण यांनी द्वितीय तर सई बिडये यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. शरयू शिरवलकर, सुषमा पोटफोडे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पाककला स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या स्पर्धेचे परीक्षण निशा केळुसकर यांनी केले. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी नगरसेविका सुमेधा अंधारी, दीपिका जाधव, जाई मुरकर, शीलत मांजरेकर, शितल सावंत आदी उपस्थित होते.






