रोटरी क्लबच्या वक्तृत्व स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे ची विद्यार्थीनी कु.प्रांजल साटमचे यश

कणकवली :प्रतिनिधी
कणकवली रोटरी क्लब आयोजित कैलासवासी दादा कुडतरकर स्मृती तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा नुकतीच विद्यामंदिर प्रशाला कणकवली येथे संपन्न झाली या स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स आणि सायन्स वरवडे या प्रशालेची विद्यार्थिनी कु.प्रांजल गणेश साटम इयत्ता दहावी हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. आपल्या निर्भीड आणि दिमाखदार वक्तृत्वाच्या शैलीत “व्यसनाच्या मोहोजालात अडकलेली तरुण पिढी” या विषयावर आपले विचार मांडले या स्पर्धेत कणकवली तालुक्यातून एकूण 35 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.
प्रांजल ला सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र तसेच पुस्तक भेट देऊन गौरविण्यात आले. नुकताच ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल आयडियलच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना देसाई तसेच आयडियलचे कोऑर्डिनेटर श्री.निलेश घेवारी यांच्या उपस्थितीत प्रांजलचा सन्मान करण्यात आला.
प्रांजल च्या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे सर, उपाध्यक्ष श्री मोहन सावंत सर,कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल सर,संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर,सहसचिव प्राध्यापक निलेश महेंद्रकर सर कोषाध्यक्ष सौ शीतल सावंत मॅडम,सल्लागार श्री डी.पी.तानवडे सर आयडियलच्या मुख्याध्यापिका सौ अर्चना देसाई मॅडम तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्गातून अभिनंदन केले जात आहे.






