महामार्गावर वाहने सोडून जाऊ नका

पोलीस उपनिरीक्षक जयराम पाटील यांचे आवाहन

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 मुंबई गोवा – मुंबई या महामार्गावर व इतर महामार्गावर बरेच चालक हॉटेल,धाबे असल्या ठिकाणी बराच वेळ थांबवून सोडून जातात.त्यामुळे त्या वाहनास पाठीमागून धडक बसून गंभीर अपघात होऊन होऊन निष्पाप बळी जातात. त्यामुळे अशा प्रकारे वाहने थांबवू नका असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक जयराम पाटील यांनी केले आहे.
कुटुंबातील कमावणारी 1 व्यक्ती अपघाती मृत्यूने गेली तर त्या कुटुंबावर आयुष्यभर दुःख राहून कुटुंबाची वाताहात होते.लहान मुलांना चालक असलेल्या वडिलांचा बालपणातच विरह होतो.हे फारच दुःख दायक आहे.
सर्व वाहन चालकांना हीच विनंती महामार्गावर वाहने थांबवून सोडून जाऊ नका. वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच वाहने चालवा त्यामुळे होणारे अपघात व मृत्युची संख्या घटण्याचे प्रमाण होईलच.
महामार्गावर वाहने सोडून जाणाऱ्या वाहन चालक/मालक तसेच मद्यसेवन करून वाहने चालविणाऱ्या वाहन चालकांवर न्यायालयीन कार्यवाही करण्यात येईल असा इशारा श्री पाटील यांनी दिला.

error: Content is protected !!