खारेपाटण बॉक्सवेल झाले प्रकाशमय

शिवसेना कणकवली तालुका प्रमुख मंगेश गुरव यांनी केला पाठपुरावा

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारेपाटण येथील बॉक्सवेल मध्ये लाईट नसल्यामुळे आज कित्येक वर्षे दाट अंधार होता.मात्र ही बाब हायवे प्राधिकरणाच्या लक्षात आणून देत व त्याचा पाठ पुरावा केला.अखेर नुकताच या बॉक्सवेल (underpass)मध्ये लाईट ची व्यवस्था करण्यात आली असून हा बॉक्सवेल आता प्रकाशमय झाला आहे.
सदर बॉक्सबेल मध्ये घाणीचे साम्राज्य साटले होते.तर अंधारामुळे लहान मुले वृद्ध व महिलाना या बॉक्सवेल मध्ये असुरक्षित वाटत होते.तसेच अंधारात गैरप्रकार व अपघात घडण्याची शक्यता असल्याने स्थानिक नागरिक व ग्रामपंचायत तसेच तालुका कृती समिती यांनी वारंवार pwd ला निवेदने दिली होती. मात्र ठोस कारवाई होत नसल्याने या कामी शिवसेना तालुका प्रमुख श्री मंगेश गुरव यांनी pwd आणि KCC कंपनीकडे पाठपुरावा केला.त्याची दखल घेत शनिवार दि.१२ जुलै २०२६ रोजी KCC कंपनी चे तंत्रज्ञ खारेपाटण येथे येत बॉक्सवेल मध्ये लाइट व्यवस्था सुरू केली. तर कामी श्री तुषार.कोळसूकार यांनी हॅलोजन देत सहकार्य केले.
खारेपाटण बॉक्सवेल (अंडरपास) प्रकाशमान झाल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून बॉक्सवेल च्या दोन्ही बाजूला वाहन चालकांसाठी आरसे सुद्धा लावण्यात आले असल्याचे श्री गुरव यांनी सांगितले.आता बॉक्सबेल मध्ये घडणारे अपघात कमी होऊन बॉक्सवेल आता महिला,मुलांना, वृद्धांना रात्रीच्यावेळी ये जा करणे सुरक्षित व सुखकर होईल असे श्री मंगेश गुरव यांनी यावेळी सांगितले.

error: Content is protected !!