कणकवली तालुका महिला व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी संजना काकडे

उपाध्यक्षपदी तृप्ती पारकर, सचिवपदी ऋतुजा कोरडे

तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित संघटना व पदाधिकाऱ्यांचे करण्यात आले अभिनंदन

महिला उद्योजकता, महिला सक्षमीकरण आणि व्यापारी महिलांमध्ये एकी व प्रगतीचा संदेश देण्याच्या दृष्टीने कणकवली तालुका महिला व्यापारी संघटना स्थापन करण्यात आली असून, २०२६ ते २०२९ या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. महिला व्यावसायिकांना एकत्र आणून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचा निर्धार नव्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी सौ. संजना संतोष काकडे, उपाध्यक्षपदी सौ. तृप्ती संतोष पारकर, सचिवपदी सौ. ऋतुजा ऋषिकेश कोरडे, सहसचिवपदी सौ. दिशा नितीन काणेकर, खजिनदारपदी सौ. निलिमा विशाल सावंत-भोगले आणि सहखजिनदारपदी सौ. स्मिता निखिल उचले-गोवेकर यांची निवड करण्यात आली.
कार्यकारिणी सदस्य म्हणून सौ. साक्षी सचिन सादये, सौ. सुप्रिया समीर पाटील, सौ. किशोरी कृष्णाजी धुपकर, सौ. तृप्ती अमोल टकले तसेच सौ. समीक्षा (शिल्पा) संतोष पेडणेकर यांची निवड करण्यात आली आहे.
संघटनेच्या सल्लागार समितीमध्ये सौ. लिना काळसेकर, सौ. मेघा शेट्टी, सौ. अमिता कुलकर्णी आणि सौ. ईशा खाडये यांचा समावेश करण्यात आला आहे.
संघटनेचे ब्रीदवाक्य “एकी, प्रगती आणि उद्योजकतेसाठी सदैव तत्पर” असे असून, महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या व्यवसायवृद्धीसाठी विविध उपक्रम राबविणे, प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि परस्पर सहकार्याची भावना अधिक दृढ करणे, हे संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, व्यापारी संघ कणकवलीचे अध्यक्ष श्री. दीपक बेलवलकर अशोक करंबेळकर विलास कोरगावकर,राजेश राजाध्यक्ष आदींनी नव्या कार्यकारिणीचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून कणकवलीतील महिला उद्योजकांच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

error: Content is protected !!