दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

दोडामार्ग पत्रकार समिती आणि सुशिलाबाई चॅरिटेबल ट्रस्टच्या विद्यमाने कार्यक्रम
प्रतिनिधी l दोडामार्ग
दोडामार्ग तालुका पत्रकार समिती आणि श्रीमती सुशिलाबाई मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट,दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने बारावी व दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मंगळवारी येथील सुशीला हॉलमध्ये करण्यात आला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम आणि गुलाबपुष्प मान्यवरांच्या हस्ते देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर,श्रीमती सुशिलाबाई मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट, दोडामार्गचे अध्यक्ष, उद्योजक व सामजिक कार्यकर्ते विवेकानंद नाईक,तहसीलदार अरुण खानोलकर, पोलिस निरीक्षक अरुण पवार, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक जयेश ठाकूर, युवा उद्योजक बाबा टोपले, शिवसेनेचे (ठाकरे गट) तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) तालुकाप्रमुख संजय गवस, मराठा महासंघ तालुकाध्यक्ष ॲड. सोनू गवस, राष्ट्रवादी काॅंग्रेस जिल्हा सरचिटणीस संदीप गवस, तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष संदीप देसाई, सचिव गणपत डांगी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य लखू खरवत, माजी अध्यक्ष प्रभाकर धुरी व सुहास देसाई आदी उपस्थित होते.
बारावीत तालुक्यात प्रथम आलेल्या दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी कृष्णराव गवस (वाणिज्य शाखा), द्वितीय क्रमांक प्रात अनुष्का धर्णे (कला शाखा) न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भेडशी, तृतीय क्रमांक प्राप्त अपूर्वा लोंढे (वाणिज्य शाखा) न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भेडशी यांच्यासहित दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज दोडामार्ग (कला शाखा) प्रथम क्रमांक प्राप्त मयुर गवस, (विज्ञान शाखा) प्रथम क्रमांक प्राप्त कोमल मिसाळ व सरस्वती विद्यामंदिर व ज्युनि.काॅलेज ऑफ सायन्स, कुडासेचा विद्यार्थी प्रथम क्रमांक प्राप्त साहिल दळवी यांचा सन्मान केला.
दहावीत तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त वेदिका नाईक (दोडामार्ग इंग्लिश स्कूल दोडामार्ग), द्वितीय क्रमांक प्राप्त अथर्व संदीप गवस (करुणा सदन इंग्लिश मीडियम स्कूल साटेली-भेडशी), व याच प्रशालेची प्रणिता पालवे यांच्यासहीत नवदुर्गा माध्यमिक विद्यालय आयी प्रशालेचा विद्यार्थी संकेत कृष्णा पर्येकर, नुतन विद्यालय कळणेची विद्यार्थिनी पूर्वा परब, समाजसेवा हायस्कूल कोलझरचा जयेश देसाई, बापूसाहेब देसाई विद्यालय उसपची नंदा गवस, सरस्वती विद्यामंदीर व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कुडासेची श्रेया सांगुर्डेकर, किर्ती विद्यालय घोटगेवाडीची कुंदा धुमास्कर, माध्यमिक विद्यालय सोनावलची सोनल झोरे, एम. आर. नाईक विद्यालय कोनाळकट्टाची तनिष्का संजय केसरकर, माध्यमिक विद्यालय मांगेलीचा सर्वेश श्रीदास मोरगावकर, शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळेची प्राजक्ता संतोष गवस, माध्यमिक विद्यालय झोळंबेचे विभागून अश्वेक गवस व जयश्री राऊळ, न्यू इंग्लिश स्कूल, भेडशीचा अनुज शिंदे, माध्यमिक विद्यालय झरेबांबरची कृपाली गवस व माध्यमिक विद्यालय माटणेचा अभिजीत पिरणकर यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.त्याचप्रमाणे शंभर टक्के निकाल लागलेल्या तालुक्यातील शाळांचा सन्मानही झाला.त्यांचे मुख्याध्यापक व प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.