बांदा याठिकाणी उड्डाणपुलाचे काम शिवसेनेकडून रोखले

आराखडा बदलल्याने साईप्रसाद काणेकर यांचा आक्षेप
सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील बांदा ठिकाणि स्थानिक प्रशासनाला तसेच स्थानिकांना विश्वासात न घेता आराखडा पूर्णपणे बदलून बांदा उड्डाणंपुलाचे काम सुरु करण्यात आल्याने आज शिवसेना शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी आक्षेप घेत काम बंद पाडले. आपला उड्डाणंपूल कामाला विरोध नसून स्थानिकांच्या मागण्यांचा विचार करण्यासाठी महामार्ग अधिकारी, ठेकेदार, ग्रामपंचायत प्रशासन व स्थानिक यांची संयुक्त बैठक घेण्याची मागणी श्री काणेकर यांनी केली आहे. यावेळी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.