उमेद मुळे स्वविकासाचे व्यासपीठ मिळाले–श्रद्धा धुरी

आचरा येथे ऋणानुबंध प्रभागसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
आचरा–अर्जुन बापर्डेकर
चूल मुल यातच अडकलेल्या ग्रामीण भागातील महिलांना उमेद मुळेच उमेद मिळून स्व विकासाचे व्यासपीठ मिळाल्याचे मत ऋणानुबंध प्रभागसंघाच्या अध्यक्षा श्रद्धा धुरी यांनी व्यक्त केले
आचरा विभागातील प्रभागसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा लौकिक सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्या सोबत व्यासपीठावर मालवण तालुका गटविकास अधिकारी आपासाहेब गुजर,तालुका अभियान व्यवस्थापक रविकिरण कांबळी, आचरा माजी सरपंच प्रणया टेमकर, चिंदर सरपंच राजश्री कोदे,आरोग्य अधिकारी डॉक्टर शामराव जाधव,सुरज बांगर,बँक आफ महाराष्ट्र शाखाधिकारी रिलेबो अरुंगम,बँक आफ इंडिया शाखाधिकारी भाग्यश्री कुलसंगे,समिर ठाकूर,पशुवैद्यकीय विभागाचे कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मालवण गटविकास अधिकारी आपासाहेब गुजर यांनीप्रभाग संघ मध्ये एकूण आठ ग्रामपंचायत 30 महसूल गाव यांच्या कार्यक्षेत्रातील महिलांच्या कुटुंबाचे समावेशन केले असल्याचे सांगितले तसेच या प्रभागाअंतर्गत 229 महिला स्वयंसहायता समूह कार्यरत असून एकूण बारा ग्रामसंघ स्थापन करण्यात आले असल्याचे सांगितले.
आरोग्य अधिकारी डॉक्टर शामराव जाधव यांनीआरोग्यविभागाच्या विविधयोजनांची महिलांना माहिती करुन दिली.
यावेळी
प्रभागामध्ये वर्षभरामध्ये उत्कृष्ट काम केलेल्यंचा सन्मान करण्यात आला.यामध्ये प्रभाग संघास वेळोवेळी सहकार्य करणारे आचरा गावच्या सरपंचा प्रणय टेमकर यांचा सन्मान करण्यात आला तसेच अभियानातून ग्राम संघ पदावरती जाऊन राजकीय क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा देखील सन्मान करण्यात आला. यामध्ये चिंदर गावच्या सरपंच राजश्री कोदे यांचा सन्मान करण्यात आला तसेच समूहांना मिळणाऱ्या बँक अर्थसाहाय्यासाठी चांगले काम करणाऱ्या बँक सखी वैशाली हिर्लेकर तसेच अक्षता खेडेकर तसेच बँक ऑफ महाराष्ट्र शाखा व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा व्यवस्थापक यांचा देखील सन्मान करण्यात आला
सुत्रसंचालन पूजा सुतार यांनी केले.





