आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनि.कॉलेज वरवडे मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा

कणकवली/मयुर ठाकूर.

  ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनि. कॉलेज वरवडे इथे आतंरराष्ट्रीय योगा दिवस मोठ्या उत्साहात  संपन्न झाला
      आपल्या भारतीय संस्कृतीत योगाला खूप महत्व आहे ,आजच्या धावपळीच्या काळात आपण योगाच्या माध्यमातून आपले शरीर आणि मन निरोगी ठेऊ शकतो आणि आपली दैनंदिन कार्ये कारणासाठी आवश्यक स्वस्थ शरीर प्राप्त करू शकतो .
 या कार्यक्रमात भारत सरकारने नियुक्त केलेल्या योग प्रशिक्षक  आणि योग मूल्यांकन कर्ता, प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका सौ.श्वेता गावडे मॅडम यांनी योगा प्रात्याक्षिके सादर केली व प्रशालेतील विद्यार्थ्यांनीही  योगा प्रात्याक्षिके व प्राणायाम प्रात्याक्षिके सादर केली 
 या कार्यक्रमात योग मूल्यांकन कर्ता व प्रशिक्षक सौ श्वेता गावडे मॅडम व योग प्रशिक्षक सौ निधी गुरव मॅडम यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान  करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. मोहन सावंत सर,कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल, मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई तसेच विद्यार्थी सर्व शिक्षक उपस्थित होते.

error: Content is protected !!