वेदांत पाटीलची नवोदय विद्यालयासाठी निवड

दोडामार्ग (वा.)
साटेली भेडशी केंद्रशाळेने जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादित केले.केंद्रशाळेचा विदयार्थी वेदांत तुकाराम पाटील याची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली. त्याला दीपक दळवी व संजीवनी आवडण यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक पूनम पालव, शिक्षक संपदा दळवी, रामा गवस,पालक, शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांच्यासह
गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ, केंद्रप्रमुख सूर्यकांत नाईक आदींनी अभिनंदन केले