आपल शरीर सुंदर आणि स्वच्छ ठेवायचे असेल तर नियमित योगा करा–योगाचार्य अशोक कांबळी

आचरा–अर्जुन बापर्डेकर
आपल शरीर आतून आणि बाहेरून स्वच्छ आणि सुंदर ठेवले तरच शरीर निरोगी राहील यासाठी नियमित योगा करणे आवशयक असल्याचे मत प्रसिद्ध योगाचार्य अशोक कांबळी यांनी व्यक्त केले.
आचरा येथील मॉर्निंग वाॅक गृपतर्फे योगदिन साजरा करण्यात आला. यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. यावेळी मॉर्निंग वाॅक गृपचे सदस्य साहित्यिक सुरेश ठाकूर,अर्जुन बापर्डेकर, मांगिरीष सांबारी,दिपक मेस्त्री, चंदू आडवलकर,रविंद्र घाडी,कदम आदी उपस्थित होते. यावेळी अशोक कांबळी यांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिकासह माहिती दिली. कार्यक्रमाची सुरवात प्राणायाम ने झाली तर समारोप ज्ञानेश्वरीच्या दोन श्लोकांनी हातात हात गुंफत नियमित योगाची शपथ घेत केली गेली

error: Content is protected !!