असलदे येथील दत्तात्रय तांबे यांचे निधन

कणकवली : तालुक्यातील असलदे बौध्दवाडी येथील दत्तात्रय गंगाराम तांबे (वय – ८३ ), ( सेवानिवृत्त पोस्ट मास्तर ) यांचे आज बुधवारी दु. १२:३० वा. अल्पशा आजाराने निधन झाले. मागील काही दिवस ते आजारी होते. मात्र त्यांची प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना मुंबई येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. मात्र आज दुपारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. पत्रकारिता क्षेत्रात कॅमेरामन पदावर कार्यरत असलेले आनंद तांबे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
कणकवली प्रतिनिधी