दापोली कृषी विद्यापीठाचे नवनिर्वाचित कुलगुरू प्राध्यापक डॉ श्री.भावे यांची कणकवली कॉलेज कणकवली ला भेट.

शिक्षण महर्षी माजी आमदार कै.केशवराव राणे यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त वाहिली आदरांजली.

कणकवली/मयुर ठाकूर.

शैक्षणिक,आरोग्य,व्यापार यांची सांगड घालत संपूर्ण कोकणासहित कणकवलीची प्रगती करण्याचे महान कार्य ज्यांनी केलं ते माजी आमदार शिक्षण महर्षी कै.केशवराव राणे साहेब.कै केशवराव राणे यांच्याकडे शिक्षणाचं विद्यापीठ म्हणूनच पाहिलं जातं.शिक्षणासाठीची आत्मीयता, तसेच नवयुवकांना घडविण्याचे कार्य आणि कोकणात शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचविण्याचे महान कार्य राणेसाहेबांच्या माध्यमातून झाले होते. तसेच कै.केशवराव राणे यांचे कृषी क्षेत्रात भरीव असे योगदान होते. त्यांच्या तेराव्या स्मृतीदिनानिमित्त आठवणींना उजाळा देण्यासाठी अनेकांनी कणकवली कॉलेज कणकवली येथे भेट देत साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.यामध्ये नुकतेच कुलगुरू या पदी विराजमान झालेले दापोली कृषी विद्यापीठाचे नवनिर्वाचित कुलगुरू प्रा. डॉ श्री.भावे यांनी देखील आजच्या स्मृतिदिनानिमित्त कणकवली कॉलेज येथे भेट देत कै केशवराव राणे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.यावेळी कै केशवराव राणे यांच्या सोबतच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन प्रा डॉ राजश्री साळुंखे, डॉ.साळुंखे सर,महाविद्यालयाचे प्राध्यापक युवराज महालिंगे तसेच इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व कणकवली शहरातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!