माजी आमदार तथा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक चेअरमन शिक्षण महर्षी कै.केशवरावजी राणे साहेब यांचा तेरावा स्मृतिदिन कणकवली कॉलेज कणकवली येथे साजरा.

कै.केशवराव राणे साहेब यांच्या आठवणींना उजाळा देत मान्यवरांनी वाहिली आदरांजली.

कणकवली/मयुर ठाकूर.

माजी आमदार,तसेच सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष,शिक्षण महर्षी तसेच शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक चेअरमन कै.केशवरावजी राणे साहेब यांचा आज तेरावा स्मृतिदिवस.कै.केशवराव राणे यांचे शिक्षण क्षेत्रात भरीव असे कार्य होते. राजकीय कारकीर्दीमध्ये सामाजिक जीवन जगत असताना सामाजिक विकास हे धोरण अंगीकृत करून कै.केशवराव राणे हे समज्याचा विकसनशील प्रवास करीत राहिले.एखादी पॉलिसी फक्त डिक्लिअर न करता ती प्रत्यक्ष जनहितापर्यंत अमलात आणण्याचं कार्य केशवराव राणे यांनी केलं.आज कणकवली कॉलेज कणकवली येथे त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या तेराव्या स्मृतिदिना प्रित्यर्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी या कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून चेअरमन शिक्षण प्रसारक मंडळ प्रा.डॉ.राजश्री साळुंखे उपस्थित होत्या.
ज्यांनी आपल्या स्मृती लोकांच्या मनावर बिंबल्या अश्याच्या व्यक्तींचे स्मृतिदिन साजरे केले जातात आणि असेच व्यक्तिमत्व असलेले माजी आमदार शिक्षण महर्षी केशवराव राणे साहेब.राणे साहेबांच्या स्मृतीन्ना ओलावा मिळावा म्हणूनच यां कार्यक्रमांची आयोजन करण्यात आलं असल्याचे प्रस्थाविक करताना कणकवली कॉलेज चे प्रिंसिपल प्रा. युवराज महालिंगे सर म्हणाले.
माणसच व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर त्याला शिक्षण दिल पाहिजे आणि शिक्षणच समज्याचं आंतर आणि बाह्य सौदर्य वाढवू शकत. त्यामुळे शिक्षणाचा प्रसार प्रचार झाला पाहिजे आणि हेच कार्य राणे साहेबांनी केल आणि कणकवली कॉलेजची स्थापना केली अस आपले विचार मांडताना प्रा.डॉ.राजेंद्रकुमार चौगुले म्हणाले.
महाराष्ट्राच्या ज्ञानगंगेमध्ये कोकणला अव्वल स्थान मिळवून दिले.विद्वात्तेची पकड असलेले व्यक्तिमत्व,माझी शाळा ही सर्वसमण्यांची,कष्टकऱ्यांची आहॆ त्यामुळे तळागाळातील कोणीही व्यक्ती शिक्षणापासून वंचित राहू नये.समाज्याचा विकास होण्यासाठी क्रांती निर्माण करणारे राणे साहेब सदैव आमचे आदर्श बनून राहिले अश्या भावना यावेळी विद्यामंदिर हायस्कूल चे मुख्याध्यापक कांबळे सर यांनी व्यक्त केल्या.
कै.केशवराव राणे यांना शिक्षणासाठीची आत्मीयता होती. त्यांनी नवयुवकांना घडविण्याचे कार्य केल.शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचविण्याचे कार्य केले.अखंड शिक्षणाचे विद्यापीठ म्हणजेच कै. केशवराव राणे साहेब.साहेबांना जे जे अधिकार मिळाले त्या त्या अधिकारांचा वापर करून कणकवली कशी समृद्ध करता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले.पूर्वीच्या काळी लालपरी गावागावात जाऊन गावकऱ्यांना सेवा प्राप्त व्हावी म्हणून भरीव योगदान दिले.कणकवली शहरात प्रांत ऑफिस,तहसीलदार ऑफिस,कोर्ट ऑफिस तसेच जिल्ह्याचे आरोग्य उपकेंद्र हे कणकवलीतच असलं पाहिजे असा अट्टाहास त्यावेळी साहेबांनी अर्थातच कै केशवराव राणे यांनी धरला होता. “पाणी आडवा-पाणी जिरवा” हे विचार प्रत्येकाच्या मनामनात रुजवत असताना त्यांनी शिवडाव,लोरे, महंमदवाडी,ओसरगाव तसेच यांसारखी अनेक धरणांची पायाभरणी केली.सरकारच्या योजनांचा येतोचित फायदा घेऊन समाजाचा विकास करण्याचं कार्य केलं.”गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एसटी”अशी मोहीम राबविली.अशी विविध कामे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये सामाजिक दृष्टिकोन ठेवून करण्यात आली होती. असं यावेळी मनोगत व्यक्त करीत असताना कै.केशवराव राणे यांच्या कन्या आणि विद्यमान शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन प्रा. डॉ.राजेश्री साळुंखे यांनी व्यक्त केल्या.यावेळी डॉक्टर साळुंखे मॅडम या भावुक देखील झाल्या होत्या.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने विशेष व्याख्यान देखील आयोजित करण्यात आलेले होते.नवीन शैक्षणिक धोरण आणि वर्तमानात स्थिती वर विशेष व्याख्यान संपन्न झाले.या व्याख्याणासाठी प्रमुख वक्ते सहाय्य्क प्राध्यापक,रसायनशास्त्र विभाग, एसआरएम कॉलेज कुडाळ प्रा डॉ प्रमोद जमदाडे.यांनी मार्गदर्शन केले.

error: Content is protected !!