आत्म्यहत्या कि घातपात ? हाॅटेलमध्ये आढळला महिलेचा मृतदेह !
कुडाळमधील नामांकित हॉटेलमध्ये मृतदेह
उलट सुलट चर्चांना उधाण
प्रतिनिधी । कुडाळ : येथील एक नामांकित हॉटेलमध्ये मुंबईस्थित महिलेचा मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. मात्र ही आत्महत्या कि घातपात? याबाबत उलटसूलट चर्चा सुरू असून याचा कसून शोध घेण्याचं आव्हान कुडाळ पोलिसांसमोर आहे.
कुडाळ शहरातील एका नामांकित हॉटेल मध्ये ४० वर्षीय मुंबईस्थित महिला मंगळवार दि. 13 जून पासून रूम नं. 208 मध्ये राहत होती. तिच्या लगतच रूम नं. 209 मध्ये जिल्ह्यातीलच दोन युवक राहत होते. त्यापैकी एक युवक कुडाळ तालुक्यातला मिळतेय. हे दोन्ही युवक त्या महिलेच्या संपर्कात होते. त्यातीलच एका युवकाने त्या महिलेच्या नावे त्या हॉटेल मध्ये रूम बुकिंग केली होती. शुक्रवारी ती महिला रूमचे दार उघडत नाही म्हणुन त्या युवकांनी हॉटेलच्या मॅनेजरला सांगितल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर कुडाळ पोलिसांपर्यंत ही माहिती पोहोचताच कुडाळ पोलिस स्थानकचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पाटील पोलिस हे. कॉ. श्री. माने व अन्य सहकार्या समवेत घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पाहणी करून रूम नं. 208 मध्ये फॅनला दोरीच्या सहाय्याने लटकलेल्या स्थितीत असलेल्या त्या महिलेचा मृतदेह त्यांनी खाली उतरविला आणि अॅम्बुलन्सने शवविच्छेदनासाठी पाठविला.
दरम्यान कुडाळ पोलिसांनी मयत महिलेच्या नातेवाईकांशी संपर्क साधुन कल्पना दिली. यावेळी त्या महिलेच्या संपर्कात असलेले दोन्ही युवक घटनास्थळी होते. पोलिसांनी या घटनेची माहिती विचारताच संशय वाढविणारी माहिती त्या युवकांनी दिल्याचे समजते. त्यामुळे ही आत्महत्या आहे कि घातपात? याचा शोध घेणे कुडाळ पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. याबाबतचा अधिक तपास कुडाळ पोलिस निरीक्षक शंकर चिंदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पाटील करत आहेत.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.