सांगवे ठाकरे गटाच्या विभागीय कार्यालयाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 50 जणांचे रक्तदान

जिल्हाप्रमुख सतीश सावंत, सुशांत नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजन

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नाटळ, सांगवे, हरकुळ विभागीय कार्यालयाच्या वतीने युवा सेने तर्फे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 50 रक्तदात्यांनी सहभाग घेतला. या शिबिराला या विभागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हाप्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र व कल्पवृक्ष रोपांचे वाटप करण्यात आल्याची माहिती युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांनी दिली. या उद्घाटन प्रसंगी सतीश सावंत, सुशांत नाईक, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, बेनी डिसोजा, मंगेश सावंत, संतोष परब, बंडू ठाकूर, शेखर सावंत, मुकेश सावंत, राजू पाटील, संदीप गावकर, तुषार गावकर, विजय गांवकर, संदेश गुरव, सुदर्शन रासम, अशोक सांवंत, योगेश तांबे, धीरज मेस्त्री विलास गुडेकर आदी उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर / कणकवली

error: Content is protected !!